टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ’

मुंबई : टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच पद्धतीनं उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारी लोक असून भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल तसेच भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर “जश्यास तसे उत्तर देऊ” असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी युवक काँग्रेस आंदोलक आमदार झिशान सिद्दीकी यांना दिला.

पेगासस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा घाट घातला होता. युवक काँग्रेसचा हा डाव मुंबई भाजपा ने उधळून लावला. “जश्यास तसे उत्तर” देण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपाने युवक काँग्रेस विरोधात आंदोलनाचा पवित्रा उचलला. ‘दाऊद की औलादों को जूत मारो’ अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसने मुंबई भाजपा विरोधात रचलेला डाव उधळून लावला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्ताना मुंबई भाजप कार्यालयावर यायच्या आधीच रोखण्यात आले.

मुंबई भाजपचे अध्यक्ष  मंगल प्रभात लोढा म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भारत मातेवर विश्वास आहे. भाजपा कार्यालयाकडे बोटे दाखवणाऱ्या दाऊद आणि टिपू सुलतानचा औलादींवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील. आज पोलिसांच्या विनंती मुळें थांबत आहोत, परंतु काँग्रेस कार्यकर्ते भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असतील तर आम्ही हल्ल्याचे उत्तर हल्ल्यानेच देऊ, असे मत मंगल जी यांनी त्यावेळी व्यक्त केले.

मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, महिला मोर्चा अध्यक्षा शीतल गंभीर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.