अतिरेक झाला की उद्रेक होणारच, मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

दरम्यान, या घटनेवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज केला गेला हे कृत्य अतिशय निंदनीय आहे आम्ही याचा निषेध करतो. शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी व आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे.

अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला का मिळत नाही? इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला यापूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे होते. आरक्षणासाठी समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले; पण आता उद्रेक होत आहे. अतिरेक झाला, की उद्रेक होणारच. समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला आहे.

येथे वाचा आणखी बातम्या

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज; आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार