40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकर्त्यांशी संवाद साधला. मात्र, तिथून परतताना त्यांना काही तरुणांच्या विरोधाचा सामना करावा लागला. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला.

दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलनात भाषण करुन परताना शरद पवार यांना काही युवकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पवारसाहेब, आपण आत्ता आलात, गेल्या ४० वर्षात काय केलं? असा सवाल आंदोलनाच्या गर्दीतून विचारण्यात आला होता. दरम्यान, त्यांचा ताफा रस्त्याने जात असताना काही कार्यकर्त्यांनी निदर्शने दिले. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ताफ्याचा मार्ग बदलवण्यात आल्याचेही समजते.