BJP Vs AAP : भाजपला मोठा धक्का माजी आमदाराचा आम आदमी पक्षात प्रवेश

BJP Vs AAP : पंजाबमधील भाजपचे माजी आमदार अरुण नारंग यांनी बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना आपचे सदस्यत्व मिळवून दिले. नारंग हे फाजिल्का जिल्ह्यातील अबोहर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुनील जाखड यांना प्रदेश भाजप अध्यक्ष करण्यात आल्याने ते नाराज होते. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान अरुण नारंग यांना त्यांच्या भागातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात येते. जाखर आणि नारंग दोघेही अबोहरचे आहेत.

सदस्यत्व मिळाल्यानंतर, AAP च्या पंजाब युनिटच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला गेला ज्यामध्ये अरुण नारंग आणि सीएम मान सोफ्यावर एकत्र बसलेले दिसत आहेत. पंजाबमध्ये आपचे कुटुंब सतत वाढत आहे, असे ट्विटमध्ये लिहिले आहे. मान सरकारच्या लोकाभिमुख धोरणांनी प्रभावित होऊन भाजपचे अबोहरचे माजी आमदार अरुण नारंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षात प्रवेश केला .

महत्वाच्या बातम्या –