शिवरायांच्या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार; शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी मोठी घोषणा करणार

Sharad Sonawane- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी जाहीर केला आहे. या संकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र सोनवणे हे येत्या २९ सप्टेंबर रोजी आता आणखी नवीन घोषणा करणार असल्याचे सांगितले जात असून आता ते नेमकी काय घोषणा करणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नरमध्ये गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर शिवरायांचा पुतळा देखील भव्यदिव्य उभारला जाणार आहे. या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार असून त्यांच्या निर्मितीसाठी शिल्पकार देखील निश्चित करण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितलं आहे. सोबतच २९ सप्टेंबर रोजी आणखीन तीन महत्वाच्या घोषणा आणि पुतळा उभारणी कामाचा सविस्तर आराखडा मांडण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत तर त्यांनी सांगितले मात्र आणखीन तीन महत्वाच्या घोषणा काय असू शकतात याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोनवणे यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडिया तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोनवणे यांनी नुकताच या घोषणेचा एक भाग समोर मात्र आता आणखीन तीन मोठ्या घोषणा नेमक्या काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-