सीबीआयच्या माध्यमातून Arvind Kejriwal यांना अटक करण्यासाठी भाजपचे महा-षडयंत्र? 

BJP- Arvind Kejariwal: आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा यशस्वीपणे पूर्ण केल्याची बातमी समोर येताच, भाजप ने सीबीआयच्या माध्यमातून (Arvind Kejriwal) अरविंद केजरीवाल  यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखत आहे. आप आणि काँग्रेस यांच्यातील इंडिया आघाडीची (India Alliance) चर्चा अतिम निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे. बहुतेक राज्यांमध्ये जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट नसताना भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जागावाटपाची ही बातमी समोर येताच भाजपमध्ये भूकंप झाला आहे. आता भाजपने युती तोडण्यासाठी महा-षडयंत्र आखले आहे असा आरोप आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेत केला.

कालपासून ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना अनेक लोकांकडून संदेश मिळत आहेत की, ‘आप’ने इंडिया फ्रंट / आघाडी सोडली नाही, तर मोदीजी सीबीआयच्या माध्यमातून ‘अरविंद केजरीवाल’ (Arvind Kejriwal) यांना अटक करतील. आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मोदीजींनी तथाकथित दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला कामाला लावले आहे. गेल्या दोन वर्षात १००० हून अधिक छापे टाकण्यात आले आहेत, इडी  ने ७ समन्स पाठवले आहेत, सीबीआय  ने अनेक नोटिसा पाठवल्या आहेत, केजरीवाल यांची सीबीआय  कडून ९ तास चौकशी करण्यात आली आहे, पण सीबीआय  आणि ईडी दोघांनाही एक पैसा किंवा इतर ठोस पुरावा असे काही सापडले नाही.

पण आता इंडिया फ्रंट /आघाडीची चर्चा पूर्ण होत असताना, मोदीजींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे अनेक मार्गाने आम्हाला सांगण्यात येत आहे ते असे आहे की लवकरच एक दोन दिवसांत सीबीआय सीआरपीसी  च्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस जारी करणार आहे आणि त्यानंतर लवकरच, आणखी एकदोन दिवसांत केजरीवाल यांना अटक करतील. आम्हाला हे देखील सांगण्यात आले आहे की जर आप ने इंडिया फ्रंट /आघाडीची सोडली तर सीबीआय  नोटीस पाठवणार नाही किंवा अरविन्द केजरीवाल यांना अटक करणार नाही.असा आरोप आप प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला.   पण ‘आप’ हा मोदीजी किंवा त्यांच्या कोणत्याही यंत्रणाना घाबरणारा पक्ष नाही – मग ती सीबीआय असो  किंवा ईडी. ‘आप’ देशातील जनतेसाठी लढत राहील त्यासाठी कोणत्याही प्रकारची किमत मोजण्याची आप  च्या नेत्यांची तयारी आहे. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग राहील असे पक्षाने म्हंटले आहे. या वेळेस आप प्रवक्ता मुकुंद किर्दत तसेच शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सतीश यादव , अक्षय शिंदे , अमोल मोरे , निरंजन अडागळे, किरण कद्रे , अमोल काळे इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?