Jitendra Awhad : युद्धावर निघाल्यानंतर तुतारी वाजवतात, ८४ वर्षाच्या योद्ध्याने युद्ध पुकारलंय

Jitendra Awhad – लोकशाही वाचवण्याकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब  या ८४ वर्षीय युद्ध्याला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. निवडणुकीमध्ये तुतारी वाजेल आणि आम्ही विचाराची लढाई जिंकू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळालंय. दरम्यान ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या रायगडावरील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहे असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी तुतारी हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी शुभसंकेत आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण त्यांनी सांकेतिक भाषेत तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका असाच संदेश शरद पवार साहेब नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना तुतारी हे चिन्ह देऊन दिला आहे. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक झाली. एक मोठा नेता येणार होता म्हणून संभ्रम निर्माण केला. आता लोकसभेच्या रणांगणात येत असताना संभ्रम पसरणार आहे. असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?