दिल्ली मेट्रोमध्ये अभिनेत्रीकडून प्रवाशाला मारहाण, शिवीगाळ; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Bobby Darling Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक बॉबी डार्लिंगचा (Bobby Darling) दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro) भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी एका पुरुष प्रवाशाला मारताना दिसत आहे. दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचं भांडण पाहून सीआयएसएफ अधिकारी त्याठिकाणी येतो आणि तो भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो. बॉबी डार्लिंग आणि संबंधित पुरुष प्रवाशादरम्यान एका क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्याचं समजत आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

यरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की बॉबीच्या हातात एक पांढऱ्या रंगाची बॅग आहे. ती बॅग खेचण्याचा प्रयत्न दुसरा प्रवासी करत असतो. तर सीआयएसएफचा अधिकारी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. बॉबी डार्लिंग त्या प्रवासाला शिवीगाळ करते आणि त्याला मारते.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole