Bihar News: बिहारच्या समस्तीपूरमध्ये दिवसाढवळ्या अजब चोरी झाली आहे. एक दोन हजाराची नव्हे तर साडे तीन लाखांची चोरी झाली आहे. ही चोरी करण्यासाठी दोन साथीदारांनी भरपूर शक्कल लढवली आणि मोठा माल लंपास केला. जाणून घेऊया कशी झाली ही चोरी?
ज्या ज्येष्ठ नागरिकाचे साडे तीन लाख रुपये चोरले गेले, त्याचं नाव चंद्रशेखर राय असं आहे. ते जितवारपूर येथील रहिवासी आहेत. जुन्या पोस्ट ऑफिस रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांनी साडेतीन लाख रुपये काढले होते. हे पैसे घेऊन ते सायकलने घरी जात होते. चंद्रशेखर राय गोला रोडजवळ आले तेव्हा बाईकवरून आलेले दोन तरुण चंद्रशेखर राय यांच्या अंगावर थुंकले. त्यामुळे चंद्रशेखर राय भडकले. त्यांच्यात आणि या दोन तरुणांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
त्यानंतर बाईकवरील एक तरुण खाली उतरला. तो चंद्रशेखर राय यांच्याकडे गेला आणि सॉरी सॉरी म्हणून लागला. आमच्याकडून चूक झाली. चला तुमचे कपडे धुवून देतो, अशी गयावया तो करू लागला. चंद्रशेखर राय यांना वाटलं या तरुणाला पश्चात्ताप झाला आहे. त्यामुळे तो मला हँडपंपवर येण्याचा आग्रह करत आहे. चंद्रशेखर रायही त्याच्यासोबत हँडपंपावर गेले. चंद्रशेखर राय यांनी त्यांची सायकल बाजूला उभी केली. पैसे असलेली थैली हँडपंपाजवळ ठेवली. आणि शर्टावरील थुंकी पाण्याने साफ करू लागले. यावेळी पाठीमागून दुसरा तरुण आला आणि पैशाने भरलेली ही थैली घेऊन पसार झाला.
या घटनेनंतर चंद्रशेखर राय चांगलेच हादरून गेले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. या चोरांना लवकरात लवकर पकडलं जाईल. आम्ही या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे, असं पोलीस निरीक्षक विक्रम आचार्य यांनी सांगितलं.
https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी
निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole