लग्नाला यायचं हं! परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची तारिख आली समोर

हिंदी चित्रपट अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti) आणि राजकारणी राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी जेव्हापासून त्यांचे नाते अधिकृत केले तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बराच वेळ मौन बाळगून होते. साखरपुडा झाल्यावर त्यांनी आपले नाते जगासमोर आणले. आता चाहत्यांना या सुंदर जोडप्याच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, परिणीती आणि राघवच्या लग्नाची (Raghav-Parineeti Wedding Date) तारीख निश्चित झाल्याची बातमी समोर येत आहे.

लग्नाची तारीख ठरली!
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा १३ मे या तारखेला साखरपुडा झाला. या जोडप्याने नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुड्याचा विधी पूर्ण केला होता. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासह इतर काही प्रसिद्ध लोकही त्यांच्या साखरपुडा कार्यक्रमात सहभागी झाले होते. एंगेजमेंटनंतर, परिणीतीचे चाहते ती लवकरात लवकर राघवची वधू बनण्याची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपणार असे दिसते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही याच वर्षी 25 सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

थाटामाटात लग्न होईल
रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या सुमारे 10 दिवस आधी हे कपल सर्व तयारी सुरू करेल. त्याचवेळी त्यांचे लग्न थाटात पार पडणार आहे. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, खास मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंतचे लोक लग्नाला उपस्थित राहू शकतात. दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा राजस्थानमध्ये लग्न करू शकतात, अशा बातम्याही येत आहेत. तिचे काही फोटो समोर आल्यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की, प्रियंकाप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार आहे.