Rajeshwari Kharat and Somnath Awghade : अखेर ‘जब्या’ला काळी चिमणी घावली! ‘शालू’सोबत जुळले प्रेमाचे धागे?

Rajeshwari Kharat and Somnath Awghade : मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या सिनेमातील सोमनाथ अवघडे (जब्या) आणि राजेश्वरी खरात (शालू) यांची जोडी माहिती नाही असा मराठी प्रेक्षक सापडणार नाही. फँड्री या सिनेमातील दोघांच्या प्रेमकहानीने सिनेचाहत्यांना अक्षरश: वेड लावले होते. जरी सिनेमात जब्याला त्याची शालू भेटली नसली तरीही खऱ्या आयुष्यात मात्र त्याने तिला जिंकल्याची चर्चा रंगली आहे.

या मागचं कारण ठरलाय शालूने शेअर केलेला तो व्हिडिओ. राजेश्वरीने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जब्या बुलेटवर बसला आहे आणि त्याच्या बाजूनेच शालू येते. शालू जब्याचा हात धरून त्याचा कुशीत येते. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सुंदरसे गाणेही वाजते आहे.

शालूच्या या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. एका युझरने या व्हिडिओवर जब्याला लॉटरी आणि काळी चिमणीची राख दोन्ही मिळाल्या वाटतं अशी भन्नाट कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युझरने दोघांचे अभिनंदन केले आहे. याच व्हिडिओवरून शालू आणि जब्या रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राजेश्वरीने देखील या व्हिडिओच्या कॅप्शनला सोमनाथ अवघडेला टॅग करून लव्ह इमोजी शेअर केला आहे. त्यामुळेच दोघे नात्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

असे असले तरीही दोन्हीही कलाकारांनी नात्यात असल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. ही निव्वळ सोशल मिडियावर चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki