#BoycottLalSinghChadda : आमिर खान वर नेमका आक्षेप काय ?

अभिराम दीक्षित –  दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो असे आमिर खानचे (Aamir Khan) इस्लामी मत त्याने एका जुन्या इंटरव्ह्यू मध्ये मांडले. याच मुलाखतीत जेष्ठ पत्रकार तवलीन सिंग (Journalist Tavleen Singh) यांनी आमिरला इस्लाम वर काही प्रश्न विचारले.आमिर खान ने या सर्वाची उत्तरे हिंदू विरोधी दिली आहेत.

भारतात असहिष्णुता वाढली आहे काय ? याचे उत्तर आमिर खान ने होकारार्थी दिले . बायकोचे नाव घेऊन भारत देश सोडुन जाण्याविषयी बोलला ….  पण हि चर्चा इथे थांबत नाही . आमिरला दहशतवादाविषयी प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने दहशतवादाला कोणताच धर्म नसतो असे उत्तर दिले. इस्लामी दहशतवाद असे म्हणू नये असे आमिरने ठासून सांगितले. मग उगीच इतरही धर्माची  नावे घेतली ! दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो असे हे लॉजिक ! पिके चित्रपटात हिंदुच्या देवाधर्माची चिकित्सा आणि चेष्टा  करणारा पुरोगामी आमिर खान इस्लाम बद्दल भलताच आस्तिक निघाला.

आमिर खान चा जन्म इस्लाम मधील अतिशय महत्वाच्या मौलवींच्या घरातला आहे . त्या सांस्कृतिक वारशातून आणि बहुश्रुत , वाचनातून त्याला इस्लाम बद्दलच्या सर्व चर्चा ठाउक आहेत. आमिरचा ब्लोग पाहिला तर त्याच्या या संबंधिच्या ज्ञानावर सहज प्रकाश पडेल. तवलीन सिंग यांनी हि चर्चा पुढे वाढवली , मुलाखतीत तावलीन सिंग यांनी  विचारले :- इस्लामला वाचवण्यात काहीही  अर्थ नाही. प्यारिस मधील हल्लेखोरांच्या हातात कुराण होते . ते अल्लाहू अकबर ओरडत होते. भारत जितका सहिष्णू वा असहिष्णू आधी होता तितकाच आताही आहे . आमिर जर तू  (हिंदुंच्या ) असहिष्णुते बद्दल इतका संवेदनशील आहेस तर या दहशत वादी हल्ल्यांबद्दल तुझी संवेदना काय आहे ? … वहाबी इस्लामच्या वाढत्या प्रसाराबद्दल तुझे काय मत ?

यावर उत्तर देताना खान साहेबांनी वहाबी इस्लाम बद्दल चकार शब्द काढला नाही. उलट इस्लाम किती गोंडस आणि शांततेचा धर्म आहे हे ते पटवत बसले . अशाप्रकारे  मॉडरेट लोक्स  धर्माचे रक्षण करतात. आणि धर्मातून  नवे   दहशतवादी तयार होत रहातात. हिंदुच्या असहिष्णुतेने चिंताक्रांत झालेला आमिर खान इस्लामी दहशतवादाबद्दल कशी  धर्म रक्षक भूमिका घेत होता ते वाखाणण्या जोगे होते.

तवलीन सिंग यांनी असेही सुचवून पाहिले कि गालिब चा भारतीय इस्लाम आणि वहाबी आक्रमक इस्लाम यात फरक केला पाहिजे . आमिरने हा सल्ला धुडकावुन लावला  . सारा इस्लाम निष्पाप आहे आणि इस्लाम हिंसेला परवानगी देत नाही अशीच रट शेवटपर्यंत लावली. लिंचिंग करणारे गुन्हेगार खरे हिंदू नाहीत असे आमिर म्हटला नाही. म्हणणार नाही . आमिरचे चिकित्सक धोरण हिंदूंबाबत आहे आणि सहिष्णू धोरण इस्लाम बाबत आहे . हाच यांचा ज़िहाद आहे .

कॉलेज मध्ये असताना आमिर खान माझाही हिरो होता. त्याचा धर्म न पाहता करोडो हिंदूंनी आमिर खान वर मनापासून प्रेम केले . राजकीय भूमिका घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र आमिरला चांद तारा दिसला . हे सिनेमातले तारे आता जमिनीवर आणावे लागतील…. दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो ! अशी हिंदुविरोधी भूमिका घेणाऱ्या आमिर खान वर – लोकशाही मार्गाने बहिष्कार टाकण्याचा – संविधानिक अधिकार – हिंदूकडे निश्चित पणे आहे .