पाच लाखांची गर्दी जमवण्याचा दावा करणाऱ्या बृजभूषण सिंहांची झाली फजिती

अयोध्या – मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Bruj Bhushan Singh) यांनी शरयू नदीच्या काठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याची माहिती समोर येत आहे. बृजभूषण सिंह  यांनी आपल्या समर्थकांसह शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ५ लाख लोक जमतील, अशी भीमगर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात या कार्यक्रमाला २००० ते २५०० लोकांचीच गर्दी जमल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, तरीही ब्रिजभूषण सिंह यांची नौटंकी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात त्यांनी  बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. जोपर्यंत राज ठाकरे आपला अहंकार सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर श्रीरामाची कृपा होणार नाही. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात येऊ शकणार नाही. राज ठाकरे हे दुर्दैवी आहेत, जर ते समजूतदार असतील तर जनतेची माफी मागायला काहीच हरकत नव्हती. इतिहास आहे, मोठमोठ्या राजांनी महाराजांनी, सम्राटांनी, संतांनीही जनतेची माफी मागितली आहे. असं ते म्हणाले.

आम्ही राज ठाकरेंना रोखले नाही, त्यांच्या अहंकाराने राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखले (Raj Thackeray was prevented from coming to Ayodhya) आहे. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात पाऊल ठेवू शकणार नाहीत, असंही ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण नंतर तब्येत बरी नसल्याचे सांगत त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यांच्या दौऱ्याला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला होता.