राज ठाकरेंना नडणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा

पुणे – पुण्यात डिसेंबर महिन्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं (Maharashtra Kesari)आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा चांगलीच चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. या स्पर्धेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांनी २० ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहतील. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव तेव्हा दौरा रद्द केला होता. पण, बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणती भूमिका घेते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.