Budget 2023 : शेतीसाठीच्या बजेटमध्ये ‘ही’ आहे स्पेशल घोषणा 

Budget 2023 India Live Updates : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2023-2024 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget 2023) सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा पाचवा अर्थसंकल्प होता. पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प  होता.

आपल्या भाषणात निर्मला सीतारमण म्हणाल्या की,सबका प्रयास, सबका विकास अंतर्गत शेतकरी, महिला, एस-एसीटी, वंचितांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी डिजिटल शेतीला चालना देण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक प्रकारची मदत देण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी तंत्रज्ञान उद्योग आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यात आला आहे. कृषी स्टार्टअपसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी बजेट परिव्यय 20 लाख कोटीपर्यंत वाढला आहे. मत्स्यपालन उपक्रमांना मदत करण्यासाठी 6000 कोटी रुपयांची उप-योजना सुरू करणार. देशभरातील सहकारी संस्थांचा नकाशा तयार करण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार केला जात आहे. येत्या ५ वर्षात बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी सरकार मदत करेल. शेतकर्‍यांसाठी फार्मा एक्सीलरेटर फंडाची योजना आहे. ऍग्री स्टार्टअप्सच्या फायद्यासाठी ऍक्सिलरेटर फंड स्वयं-टिकाऊ स्वच्छ वनस्पतींसाठी एक योजना सुरू करेल. आत्मनिर्भर स्वच्छ प्लांटसाठी 2200 कोटींची तरतूद केली जाईल असं त्यांनी म्हटले आहे.