आमदाराच्या घरात आमदार व खासदाराच्या घरात खासदार व्हावा ही संस्कृती योग्य नाही – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : उद्याही निवडणुका झाल्या तरी महायुतीची तयारी आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मन आणि मतपरिवर्तन झालेले दिसेल.

नागपुरात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींच्या संकल्पाला जनतेची साथ मिळेल. जसंजसे दिवस २०२४ कडे जातील तसंतसे ५१ टक्के मते भाजपा व महायुतीला मिळतील व निवडणुकीत मताची टक्केवारी वाढेल. नेत्याचा ओघही भाजपाकडे येईल. त्यांना समावून घेण्याची क्षमता भाजपात आहे.

 मोदी लोकशाहीसाठी पोषक
आमदाराच्या घरात आमदार व खासदाराच्या घरात खासदार व्हावा ही संस्कृती योग्य नाही. कर्तृत्वशून्य असताना त्यास आमदार करावे हा आग्रह असतो तो मोडून काढण्यासाठी मोदीजींनी लोकशाहीला पोषक असे अनेक निर्णय घेतले. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला महामंत्री असावी, युवकांना संधी मिळावी जेणेकरून युवक राजकारणात येऊन तर तो देशाकरिता राजकारणात काम करेल. मी आणि माझा मुलगा ही उद्धव ठाकरे याचा मी मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री या ज्या सवयी आहेत या सवयी बंद व्हाव्यात यासाठी मोदीजींनी हा आदर्श समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे असं देखील ते म्हणाले.