Budget 2023 : 38800 शिक्षकांची भरती करणार; राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाणार – अर्थमंत्री

Budget 2023 India Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2023-2024 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget 2023) सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा पाचवा अर्थसंकल्प होता. पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प होता. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा करत सर्वसामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या भाषणात निर्मला सीतारामन यांनी सांगितले की , दर्जेदार पुस्तके उपलब्ध होण्यासाठी मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. आदिम असुरक्षित आदिवासी समूह अभियान सुरू केले जात असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 15000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

केंद्र एकलव्य विद्यालयासाठी 38800 शिक्षकांची भरती करणार आहे. मध्य कर्नाटकातील दुष्काळी भागातील अप्पर भद्रा प्रकल्पासाठी ५३०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. PM आवास योजनेसाठी 79000 कोटींचा खर्च असेल ज्यात 66% वाढ होईल. तुरुंगात बंद असलेल्या गरीबांना आर्थिक मदत केली जाईल. भांडवली गुंतवणूक परिव्यय 33% ने वाढून 10 लाख कोटी झाला जो GDP च्या 3.3% असेल.