IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वी ICC केलेली घोषणा ऐकून भारतीय चाहते आनंदाने उड्या मारतील

IND vs NZ World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. आता उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला होणार आहेत. पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येतील. या सामन्यांसाठी आयसीसीने मॅच ऑफिसर्सची (Match Officiers) घोषणा केली आहे.

IND vs NZ सामन्यात अंपायरिंग कोण करणार? यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत. रॉड टकर आपल्या 100 व्या एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग करताना दिसणार आहे. त्याचवेळी, या सामन्यात, तृतीय पंच जोएल विल्सन असतील आणि चौथे पंच अॅड्रियन होल्डस्टॉक असतील आणि सामनाधिकारी अँडी पायक्राफ्ट असतील. म्हणजेच यावेळी रिचर्ड केटलबरो भारताच्या बाद फेरीच्या सामन्यात अंपायरिंग करताना दिसणार नाही. रिचर्ड केटलबरो यांनी टीम इंडियाच्या गेल्या काही बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आणि चाहत्यांची निराशा झाली.

भारताचे नितीन मेनन आणि रिचर्ड कॅटलबरो दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात जबाबदारी सांभाळतील. त्याच वेळी, तिसरे पंच ख्रिस गॅफनी असतील आणि चौथे पंच मायकेल गॉफ असतील. याशिवाय भारताचा जवागल श्रीनाथ या सामन्यात सामनाधिकारी असेल.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत