एम फक्टो मार्फत प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एम फक्टो) यांच्यामार्फत सोमवार, दिनांक 18 जुलै 2022 रोजी मा. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकां मार्फत धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. प्राध्यापकांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.

1) दिनांक 4 फेब्रुवारी 2013 ते 10 मे 2013 या कालावधीत केलेल्या परीक्षा बहिष्कार आंदोलनामुळे बेकायदेशीर रित्या कापलेल्या 71 दिवसाच्या पगाराचा परतावा मा. उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून त्याची अंमलबजावणी करावी.

2) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक 18 जुलै 2018 च्या रेगुलेशन नुसार समग्र योजना जशीच्या तशी लागू करणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करावी .

3)अर्धवेळ महाविद्यालयीन शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा .

4)युजीसी च्या धोरणानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांची शंभर टक्के रिक्त पदे भरण्यात यावीत.

6) सहसंचालक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.

7) एम फिल पदवी प्राप्त व 1992 ते 2010 में नियुक्त प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा. 8)प्राध्यापकांना कँसचे लाभ वेळेत मिळावेत.
इत्यादी मागण्यांसाठी प्राध्यापक धरणे आंदोलन करीत आहेत.