पिंपळगावला रंगली बैलांची चित्तथरारक झुंज… पंचमीला परंपरेनुसार गावात बैलांच्या झुंजीचे आयोजन… 

सचिन आव्हाड/ दौंड – दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे नागपंचमीनिमित्त बैलांच्या झुंजीचे (bull fight) आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैलांच्या चित्तथरारक झुंजींनी  प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कोरोना (CORONA) काळात पंचमी निमित्त होणाऱ्या झुंजी बंद होत्या. यंदा बैलांच्या झुंजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पिंपळगाव येथील परंपरेनुसार दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी  बैलांच्या झुंजी लावल्या जातात. कोरोना काळामध्ये बैलांच्या झुंजी बंद होत्या. मात्र यंदा  काही ग्रामस्थांच्या पुढाकाराने झुंजी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांसह  परिसरातील शेतकरी व बैल शौकिनांनी झुंजी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या स्पर्धेमध्ये अमोल नातू यांच्या बैलाने प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी अमोल नातू यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक दुर्गामाता मित्र मंडळ,  तृतीय क्रमांक विक्रम रानवडे, चतुर्थ क्रमांक देलवडी चे राहुल शेलार व पाचव्या क्रमांकाचा मान ऋषिकेश नातू यांच्या बैलाला मिळाला. सर्व विजेत्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.