Sanjay Raut | ‘हट्ट करू नका‘ असा इशारा देत संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांचा अपमान केला, भाजपाचे टीकास्त्र

Sanjay Raut | लोकसभा निवडणूक जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बुधवारी (६ मार्च) बैठक पार पडली. या बैठकीनंतर आजच्या बैठकीत मनासारखी चर्चा झाली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना युतीत किंवा आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणे निर्णय होत नाहीत. आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळं काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावं हा हट्ट सोडला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावरुन आता भाजपाने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते, असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे.

पुढे बोलताना भाजपाने म्हटले, महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

काल राऊत यांनी प्रकाश जी आंबेडकर यांना ‘हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे, असेही भाजपाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा