जालनाकरांनो! तुमचा पालकमंत्री बुद्धू आहे; गोपीचंद पडळकरांची टीका

जालना – गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) हे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच आता त्यांनी पालक मंत्र्यांनी आरोग्य भरती परीक्षेत मोठा घोटाळा (Big scam in health recruitment exams) केल्याचा असल्याचा गंभीर आरोप जालन्यात केला आहे. न्यासा ( Nyasa ) सारख्या ब्लॅक लिस्टेड कंपनीला (Black listed company) आम्ही नकार दिले. मात्र ब्लॅक लिस्टेट कंपनीला यांनी कंत्राट देवून गोलमाल केला, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

आरोग्य मंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना? अशा हा कचाट्यात आरोग्य मंत्री अडकला असल्याचा आरोप करत त्यांनी राजेश टोपे (Rajesh Tope) यांचे नाव न घेता टीका केली आहे. परीक्षा सेंटर देताना मुंबईच्या मुलांना जालना सेंटर असे कुठे झाले का? तुमचा पालकमंत्री बुद्धू, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी ( Gopichand Padalkar ) उपस्थित केला आहे.