चांद्यापासून बांद्यापर्यंत नव्या पर्वाची सुरुवात करु आणि विकासाची नवी पहाट निर्माण करुया – सुनिल तटकरे

Sunil Tatkare – चांद्यापासून बांद्यापर्यंत नव्या पर्वाची सुरुवात करु आणि विकासाची नवी पहाट निर्माण करुया असे आवाहन करतानाच हेच प्रकाशमय जीवन नव्या पर्वात आपल्या आयुष्यात येवो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी चंद्रपूरकरांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पाच वेळा राज्यव्यापी दौरा केला त्यावेळी जे अनुभवता आले नाही ते आज चंद्रपूरमध्ये पक्षाची ताकद बघून अनुभवता आले आहे. त्यामुळे या जिल्हयात पक्षाचे भवितव्य कराल याबद्दल माझ्या मनात शंका नाही असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

अजितदादांनी (Ajit Pawar) योग्यवेळी अचूक निर्णय घेतला. आपण नवी पहाट बघत असतो ती पहाट अजितदादांच्या नेतृत्वाखाली पहायला राज्यातील जनतेला पहायला मिळणार आहे.

चंद्रपूरकरांशी माझं वेगळं नातं आहे. चंद्रपूरला ऊर्जामंत्री असताना पाचसहा वेळा आलो होतो याची आठवण करून देतानाच राज्य सरकारची ताकद चंद्रपूरमधील पक्षाच्या पाठीशी उभी करेन असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी यावेळी दिले.

सहजासहजी नवे पर्व सुरू होऊ शकत नाही मात्र अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पर्व आपण सुरु केले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र सोयीस्कर भूमिका त्यावेळी घेतली गेली असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

इथे विश्रामगृहापलीकडे कधी बैठका काहींच्या झाल्या नाहीत परंतु आज जी रॅली काढली त्यावरून अजितदादा पवार, पक्षावर प्रेम करणारे लोक प्रचंड आहेत हे दिसले अशा शब्दात कौतुकही सुनिल तटकरे यांनी केले.

फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचार पुढे घेऊन नव्या पर्वाला सुरूवात दादांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

अदिती तटकरे (Aditi tatkare) यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले जाणार आहे. अदिती तटकरे, रुपालीताई चाकणकर तुम्ही महिनाभरात पूर्व विदर्भातील महिलांसाठी असलेल्या योजनांसाठी पाऊले उचला असे आदेशच सुनिल तटकरे यांनी यावेळी दिले.

एका विचाराचे सरकार राज्यात आणि केंद्रात असेल तर आपल्याला लोकांची विकासकामे करता येतील या उद्देशानेच हा निर्णय झाला असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

सूफडा साफ होईल असे शब्द काहीजण वापरत होते परंतु कालच्या निकालाने ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे सिद्ध झाले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

बारामती खासदारांनी काम न केल्यामुळे लोकांनी पाठ फिरवली अशी जोरदार टीका करतानाच अजितदादांवर बारामतीकरांनी विश्वास ठेवत ग्रामपंचायतीमध्ये सत्ता दिली याची आठवणही रुपालीताई चाकणकर यांनी करून दिली. यावेळी लेक लाडकी या योजनेबद्दल रुपालीताई चाकणकर यांनी माहिती दिली.

या मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी विचार मांडले.

‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ या अभियानाचा आजचा तिसरा दिवस असून चंद्रपूर शहरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभला.

चंद्रपूर जिल्हयात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे आगमन होताच युवकांनी भव्य मोटारसायकल रॅलीने जोरदार स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे गडचिरोली जिल्हयातून चंद्रपूरकडे जात असताना गावागावाच्या सीमेवर सत्कार करण्यात आला.

या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, नागपूर विभागीय अध्यक्ष निखिल ठाकरे, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सचिव आबिद अली,महिला शहर कार्याध्यक्ष चारूशिला बारसागडे,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी,युवक शहरध्यक्ष अभिनव देशपांडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे,विद्यार्थी शहराध्यक्ष कोमिल पडावी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’