तांदूळ खरेदी करताय? असा ओळख नवा – जुना तांदूळ … !

टीम आझाद मराठी : तांदूळ खरेदी करताना तुम्ही कोणत्या निकषांना प्राधान्य देता? तांदूळ कोणत्या कंपनीचा आहे, दर्जा, चव, कि आकार? प्रत्येकाच्या आवडीनुसार गृहिणी तांदूळ निवडतात. पण तुम्हाला तांदूळ नवा आहे कि जुना हे ओळखता येते का ? तर मग या सोप्या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता कि तांदूळ नवीन आहे कि जुना. सोबत काही खास टिप्स ज्यामुळे घरात तांदूळ दीर्घकाळ टिकून राहू शकतो.

१. तांदळाचा गोडसर वास आला तर तो नवीन आहे.
२. तांदळाचा एक दाणा दाताखाली चावून कटकण चावला तर तो जूना आहे, आणि दाताला चिकटला तर तो नविन आहे .
३. मध्यम जूने तांदूळ असतील तर एक वाटीचा भात बनवायचा असेल तर दीड वाटी पाणी ठेवावे .
४. तांदूळ खूपजूने असतील तर एक वाटी तांदूळ आणि दोन वाट्या पाणी घालावे .
५ . भात शिजवताना तेल घातले तर भात मोकळा होतो .
६ . भात शिवताना लिंबाचा रस टाकला तर भात पांढरा दिसतो व चमक येते .
७ . कडूनिंबाची पान सुकवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून पिशवीला सुई ने छिद्र पाडून तांदळाच्या डब्यात पिशवी ठेवावी .
८ . तांदूळ साठवून ठेवायचे असतील तर तांदळामध्ये खडी मीठाचे खडे टाकून भरून ठेवावे, कीड लागत नाही .
८ . सुक्या मिरच्या तांदळाच्या डब्यात ठेवाव्या.