वैभवराजेंचा करमाळा तालुक्यातील जनसंपर्क पाहता त्यांचा आमच्या पक्षाला निश्चित फायदा होईल – हाके

करमाळा – माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र आणि युवक कॉंग्रेसचे नेते वैभवराजे जगताप (Vaibhavraje Jagtap) यांनी अखेर कॉंग्रेसला राम-राम ठोकला आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसला राम राम ठोकणाऱ्या जगताप यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

दरम्यान, या पक्ष प्रवेशावर प्रवक्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, शिवसैनिकांची मजबूत फळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पक्षाला मिळत आहे. आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील करमाळाचे माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,यांनी प्रवेश केला, करमाळा तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क पाहता त्यांचा आमच्या पक्षाला निश्चित फायदा होईल असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला आहे.