Disha salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी समोर आली मोठी माहिती, तिचा मृत्यू हा…

मुंबई :मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Death case) मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आलाय. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचं सीबीआयनं (CBI) आपल्या अहवालातून स्पष्ट केलंय.  दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी (Sushant Singh Rajput Death Case) जोडलं जात होतं. मात्र दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. ( CBI has clarified in its report that Disha Salian’s death was accidental)

28 वर्षीय दिशा सालियन ही मालाड येथे राहत होती. मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन दिशा सालियन खाली कोसळली होती. यात तिचा जागीच मृत्यू झाला होती. ही घटना 8 जून आणि 9 जूनच्या मध्यरात्री 2020 साली घडली होती.

विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला.   दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याच्या वृत्तानं मोठीच खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.