आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; शिरसाट, कडू यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे आहेत चर्चेत

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागलेल्या महत्त्वाच्या आमदारांची नाराजी यावेळी दूर होण्याची शक्यता आहे. आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू, भरत गोगावले नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात या आमदारांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय मंजुळा गावित, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम आदींच्या नावाचीही चर्चा आहे.शिंदे गटाचे 10 तर भाजप पक्षाचे 13 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून संजय कुटे, नितेश राणे आदी नेत्यांची नावे नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.