औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचा ‘एकला चलो रे’चा नारा ?, सुरु केली जोरदार तयारी…

औरंगाबाद : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस चे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कंबर कसली असून देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार तळागळातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासठी विक्रमी संख्येने सभासद नोंदणी अभियान सुरु करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी दिली. सदस्य नोंदणी जरी पक्षाचा कार्यक्रम असला तरी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या भरवशावर न बसता स्वबळाची तयारी करत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल पुंड यांच्या पुढाकारातून पुंडलिक नगर, हनुमान चौक येथे सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी नगरसेवक काशिनाथ कोकाटे, प्रदेश सरचटणीस मुश्ताक अहेमद, प्रदेश सरचिटणीस प्रा. माणिक शिंदे, यांच्या उपस्थतीमध्ये करण्यात आला. यावेळी अभिषेक देशमुख म्हणाले की, शहरभरात राष्ट्रवादीच्या या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद या अभियानास मिळत आहे. महिनाभर है अभियान सुरु राहणार असून नागरिकांनी व तरुणाईने जास्तीत जास्त संख्येने या अभियानात सहभागी होऊन आपली सदस्य नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी राजाराम मोरे, संदीप शेळके, सोशल मीडियाचे मराठवाडा सरचिटणीस जावेद खान, आयुब खान, पूर्व विधानसभा शहराध्यक्ष हरबक पाटील, दिपक परेराव, रणजित मिसाळ, अंकुश जाधव, अन्वर नवाब, रणजित मिसाळ, श्रावण आगळे, राहुल कावरे, गजानन सरोसे, प्रमोद पडूळ, अक्षय शिंदे, विशाल सपकाळ, सूरज डवणे, आदींची उपस्थिती होती.

क्रांती चौक येथे महिलांची सर्वाधिक नोंदणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात सर्वच वार्डामध्ये सभासद नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी सांगितले. क्रांती चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फिरोज कुरैशी यांच्या पुढाकाराने कार्यालयात भव्य सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात महिलांनी प्रचंड संख्येने आपली उपस्थिती दर्शवून सर्वाधिक सदस्य नोंदणीचे अर्ज भरले. यावेळी

प्रदेश सरचटणीस मुश्ताक अहेमद,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन,शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, प्रदेश सरचटणीस मुश्ताक अहेमद, प्रा. माणिक शिंदे, संदीप शेळके, आयुब खान, अमीर जहागीरदार, वाजीद कुरैशी, बाबर कुरैशी, तन्वीर हुसैन, सय्यद शाहिद, आशिष इंगळे, अझहर कुरैशी, आशिष नरवडे, विशाल पुंड यांची उपस्थिती होती.