रामदासभाई तुम्ही दुसरी इनिंग सुरू करा थांबु नका; एकनाथ शिंदेंचे रामदास कदमांना आवाहन

रत्नागिरी – रामदासभाई तुम्ही दुसरी इनिंग सुरू करा थांबु नका.असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या अष्टप्रधान मंडळात जी नेते मंडळी होती त्यामध्ये रामदासभाई कदम(Ramdas Kadam) यांचा समावेश होता. त्यामुळे आता भाई तुम्ही दुसरी इनिंग सुरू व पुन्हा राजकारणात सक्रिय व्हा.आम्ही आपल्या सोबत आहोत.अशा शब्दांत कौतुक करत प्रेमाचा सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे(urban devlopment minister Eknath Shinde) यांनी जाहिर व्यासपीठावरून दिला आहे.

माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम लिखित ‘जागर कदम वंशाचा'(jagar kadam vanshacha) पुस्तकाचे प्रकाशन(book publish) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खेड जामगे येथे करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या राजकीय सामाजिक कामाचे कौतुक करून त्यांनी राजकीय प्रवाह पासून दूर न जाता पुन्हा नव्याने सक्रिय होऊन दुसऱ्या इनिगची जोरदार सुरुवात करावी अशा शब्दात शुभेछा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांचे सुपूत्र आमदार योगेश कदम(Yogesh kadam) यांनाही तुला पुन्हा प्रचार करावा लागणार नाही असा कायापालट कर तुला जिथे लागतील तिथे विकासकामासाठी पैसे कमी पडणार नाहीत लोकांनी ज्या अपेक्षेने निवडून दिले त्याला तू उतरला आहेसच पण भविष्यात तुला प्रचारही करावा लागणार नाही अस काम आपल्याला या मतदारसंघात करायचे आहे असे सांगत पुन्हा या मतदारसंघाचे आमदार योगेश कदमच असतील असा स्पष्ट संकेत दिला.