‘जरांगेंकडून सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट; बोलविता धनी कोण?’

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे. जातीवरून टीका करतानाच त्यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला, हे महाराष्ट्र व भाजपा सहन नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

नागपूर येथे माध्यमांना त्यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकविले. मनोज जरांगे यांचा जीव वाचायला हवा आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम फडणवीस यांनी केले. त्यांच्यासारख्या निष्कलंक माणसावर आरोप करणे हा महाराष्ट्रासाठी वाईट दिवस आहे.

पुढे ते म्हणाले, जरांगे सागर बंगल्यावर जात आहेत; यात फडणवीसांची काय चुक आहे. ज्यांनी ४० वर्षे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण घालविले, अशा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर जाऊन प्रश्न विचारायला हवा. फडणवीसांवर केलेले असे वक्तव्य मराठा समाजाला मान्य नाहीं आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेतृत्त्व आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार