मनोज जरांगे धादांत खोटे बोलत आहेत, त्यांचे आरोप बिनबुडाचे; फडणवीसांचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता. माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, पण खोटो आरोप सहन करणार नाही, असे गंभीर आरोप जरांगेंनी फडणवीसांवर केले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, ‘सागर बंगला सरकारी आहे. त्यामुळे सागर बंगल्यावर सरकारी कामासाठी कोणाचीही अडवणूक होणार नाही. ते कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती हवी आहे? मला माहीत नाही, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. धादांत खोटे आहेत. मराठा समाजासाठी सारथी सारख्या योजना सुरु केली. मराठा आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं’.

‘तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत. जी स्क्रिप्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते, ती स्क्रिप्ट मनोज जरांगे यांनी का मांडावी? कायदा व सुव्यवस्था सांभाळून कोणीही आंदोलन केलं तरी हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आंदोलन केलं तर पोलिसांना योग्य कारवाई करावी लागेल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार