जरांगे जी स्क्रीप्ट वाचून दाखवत त्या स्क्रीप्टला तुतारीचा वास येत आहे – राणे

Manoj Jarange Vs Devendra Fadanvis | ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, हि टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केल्याने तसेच राजकीय स्वरूपाचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरांगे यांनी फडणवीस यांना शिवीगाळ देखील केल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपनेते आक्रमक झाले आहेत.

भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये. फडणवीस यांनीच सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. संपूर्ण राज्याला माहीत आहे. तरीही जरांगे फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. हे चुकीचं आहे. जरांगे यांनी फडणवीस यांच्याविरोधात बोलू नये. आमच्या नेतृत्वाविरोधात बोलू नये. आम्हीही मराठा आहोत. आम्ही दाखवून देऊ, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.

मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. ज्या मनोज जरांगे यांचा लढा मराठा आरक्षणासाठी लढा आहे की फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी लढा आहे. जरांगे जी स्क्रीप्ट वाचून दाखवत आहेत, ती कुणाची आहे? त्यांच्या स्क्रीप्टला तुतारीचा वास येत आहे. त्यांनी मराठा समाजापर्यंतच आंदोलन करावं. त्यांनी आमच्या नेतृत्वावर टीका केली तर सागर बंगल्याच्या समोर एक भिंत आहे, तिथूनच माघारी जावं लागेल हे सांगतो, असा इशारा देतानाच सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं आहे. त्यांचं समाधान होत नाही. पण मराठा समाज आनंदात आहे, असं नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार