“प्रिय ISRO…”; दही-साखर पोस्ट करत झोमॅटोकडून चांद्रयान-3 मोहिमेसाठी गोड शुभेच्छा!

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेच्या चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) यशस्वी लँडिंगसाठी, देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशाच्या बहुतांश भागात पूजा आणि हवन केले जात आहेत. चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६.४० वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयान उतरताच असे करणारा भारत हा जगातील एकमेव देश बनेल. कारण याआधी कोणत्याही देशाचा रोव्हर येथे उतरलेला नाही.

दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने भारताच्या चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वी दही आणि साखरेचे चित्र पोस्ट करून उत्साह (Zomato Post On Chandrayaan 3 Landing) दाखवला आहे.

दही साखर भारतात शुभ मानल्या जाते. झोमॅटोने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी एक गोड संदेश पोस्ट केला. “प्रिय इस्रो आज चांद्रयान -3 लँडिंगसाठी सर्व शुभेच्छा,” असे संदेशात म्हटले आहे. यावेळी दही-साखरचा फोटो देखील झोमॅटोने ट्वीट केला आहे.