उद्धव ठाकरेंची राजीनामा देताना घाई झाली, आता परिस्थिती बदलू शकत नाही – छगन भुजबळ

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात शिवसेना भाजप सरकारला दिलासा दिला असला तरीही एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हीप भरत गोगावले बेकायदेशीर आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे. राज्यपालांचे भूमिकेवर ताशेरे ओढत  उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते असं कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला या संपूर्ण घडामोडीत ठाकरेंचा राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे.  उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणे चुकीचा होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते.  त्यामुळे शिंदे सरकार बचावलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सरकारला कोणताही धोका नाही.

अशातच आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे वाचले आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, असे मत माजी मंत्री, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. हा राजीनामा देताना जी घाई झाली, तो निर्णय झाला नसता, तर कदाचित आजची परिस्थिती बदलू शकली असती, आता हे बदलू शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.