५८ मोर्चे शांततेत निघाले ना… मग आता जाळपोळ कशाला… एकत्र बसा आणि प्रश्न सोडवा ना! – भुजबळ

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ९९ मध्ये स्थापन झाला या पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होता असे सांगतानाच शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारासोबत जाऊन काम करणार आहोत. अजित पवार (Ajit Pawar_ यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सत्तेत आम्ही गेलो त्याअगोदर उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो म्हणजे आमची विचारधारा बदलली का? भाजपसोबत गेलो तर राग का येतो असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.

महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी महायुतीत सहभागी झालो. अडचणीचे प्रश्न एकत्र बसून सोडवत आहोत. न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. यामध्ये आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करायचे आहे. राजकारणातील विरोधक आहोत .शत्रू तर नाही ना …मग शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे असे सांगतानाच जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे तरच आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्व घटकांना सोबत घ्यावे लागणार आहे. सर्वसमावेशक मंत्रीमंडळ आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळ जे बोलतात तर काय बोलतात तर अजितदादा बोलतात, फडणवीस बोलतात तेच बोलतात… दुसर्‍याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र वेगवेगळे अर्थ काढून षडयंत्र कुणाचे सुरू आहे. आमच्या आमदारांची घरे जाळली गेली… ५८ मोर्चे शांततेत निघाले ना… मग आता जाळपोळ कशाला… बसा एकत्र आणि सोडवा प्रश्न ना… सर्वांना एकत्र बोलवा आणि सांगा… कायदा हातात घेऊन काही करु नका… सरकारला वेठीस धरु नका… त्यात जनतेला वेठीस धरले जाते हे लक्षात घ्या असेही छगन भुजबळ म्हणाले.

राज्यकर्ते सर्वांचे असतात म्हणून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. मात्र अन्याय होत असेल तर आवाजही उठवला पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे.. उद्योगधंदे आले पाहिजे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, यशवंतराव चव्हाण यांचा आहे त्यामुळे सर्वांना पुढे घेऊन जात आहोत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

ओबीसी जनगणना व्हावी ही मागणी केली आहे. एक राज्य करते तर सगळ्या राज्यांनीही केली पाहिजे. प्रसंगाला तोंड दिले पाहिजे. आपल्याला जुन्या मित्रांसोबत आता लढाई करावी लागत आहे असे सांगतानाच ‘न पुच्छो मेरी मंजिल कहा है अभी तो सफर की शुरुवात की है’ … हे शेर ऐकवत छगन भुजबळ यांनी भाषणाची सांगता केली.

‘घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’ या अभियानातंर्गत कर्जत येथे दोन दिवसाचे वैचारिक मंथन शिबीर आज पार पडले.

युवती संघटनेच्यावतीने’ अजित पर्व युवती सर्व ‘देऊ उभारी घेऊ भरारी युवती आमची कारभारी या भरारी पथकाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व मंत्र्यांचा सत्कार फुले पगडी व उपरणे देऊन करण्यात आला

वैचारिक मंथन शिबीराच्या दुसर्‍या दिवशी माजी खासदार आनंद परांजपे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष, युवक, युवती, प्रवक्ते, महिला पदाधिकारी आदींनी आपले विचार मांडले. या शिबिराचे सुत्रसंचालन युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले.

या वैचारिक मंथन शिबीराला अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी, सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, युवक, युवती, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी