Chinchwad :  पोस्टल मतांमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली

Pune – पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आणि  कसबा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडत आहे.सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतांमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे. (Chinchwad :  BJP candidate Ashwini Jagtap leads in postal votes).