kasba bypoll election result: आनंद दवेंनाही कसब्यात विजयाची अपेक्षा!

Pune – पुण्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll) आणि  कसबा (Kasaba Bypoll) पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate), भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), आणि अपक्ष राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मात्र यातच आता हिंदू महासंघाचे आनंद दवे (Aanand Dave) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  या निवडणुकीने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे. आमचा राजकीय पक्ष आहे. आमची उमेदवारी उभी केल्यामुळे कुणाचं नुकसान किंवा फायदा होत असेल, तर त्याचा विचार आम्ही करण्याचं कारण नाही. आमचा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहे हे नक्की असं ते म्हणाले आहेत.