सुपाऱ्या घेवून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना पुन्हा इथे बोलावू नका; जाणून घ्या चित्रा वाघ का भडकल्या?

यवतमाळ: राज्यातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) पत्रकारांवरच भडकल्या. न्याय व्यवस्था है क्या आप? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी पत्रकारांवर आगपाखड केली. या घटनेची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.

संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच रागाच्याभरात वाघ यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर चांगलेच तोंडसुख घेतले. सुपाऱ्या घेऊन आम्हाला प्रश्न विचारात जाऊ नका असं त्यांनी त्या पत्रकाराला सुनावलं. या अशा पत्रकारांना पुन्हा बोलावत जाऊ नका अशी सूचना देखील त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केली.