काय नाना तुम्ही पण…; चित्रा वाघ यांनी शेअर केला नाना पटोलेंचा ‘वेगळाच’  व्हिडीओ

मुंबई – महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हे असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नाना पटोले चेरापुंजी, मेघालय येथे हॉटेलमध्ये एका महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे फोटोही जोडण्यात आले आहेत. सोबत काय झाडी काय डोंगर हे गाणेही जोडण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचे म्हणत तो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.आझाद मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

दरम्यान,  पब्लिक डोमेनमध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत ती खासगी असते. एकदा ती सार्वजनिक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची आपल्याला मुभा आहे. त्यामुळे सगळेच प्रश्न विचारतात. मीच प्रश्न विचारला अशातला भाग नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी उत्तर द्यावे, असे चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे.