शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल केले बरखास्त

Mumbai – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त  केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवलं असून ते व्हायरल झालं आहे. यासोबत त्यांनी ट्विट करत अधिकृतपणे निर्णयाची माहिती दिली आहे.

दरम्यान हा निर्णय महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटमध्ये कुठेही या निर्णयामागील कारणाचा उल्लेख केलेला नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्याच्या तीन आठवड्यांनंतर शरद पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.