ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीन चिट; समीर वानखेडे म्हणाले…

मुंबई : कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात (Cordelia Cruz Drugs Party) अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Shahrukh Khan’s Son Aryan Khan) याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिलेला ६० दिवसांचा अवधी या महिन्यात संपला. एनसीबीकडून आज पहिले आरोपपत्र सादर कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे.

एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दतवाढ दिलेली. हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ 29 मे रोजी संपुष्टात येणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान, आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर सीएनएनने समीर वानखेडे यांची माध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर समीर वानखेडे यांनी म्हटलं, “मी या प्रकरणाशी आता संबंधित नाहीये आणि यावर भाष्य  करू इच्छित नाही”.असं ते म्हणाले.