श्रावण सोमवारी भगवान शंकाराला दाखवा ‘नारळाच्या खीर’चा नैवेद्य, रेसिपीही खूप सोपी

Coconut Kheer Recipe: श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणाचे दोन सोमवार झाले आहेत. आता श्रावणचा तिसरा सोमवार येणार आहे. भोले बाबांना प्रसन्न करण्यासाठी सर्व भक्त विधिवत पूजा करतात आणि कडक व्रत पाळतात. श्रावण सोमवारी भगवान शंकराला मिठाई अर्पण केली जाते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक मस्त गोड रेसिपी घेऊन आलो आहे, ज्याची चव खूप रुचकर आणि तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. होय, आम्ही नारळाच्या खीरबद्दल बोलत आहोत. नारळाची खीर खायला खूप चविष्ट असते  आणि त्याची रेसिपीही खूप सोपी आहे. जाणून घेऊया…

नारळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 नारळ किसलेला
1 लिटर दूध
साखर 3 कप
अर्धा टीस्पून वेलची पावडर
अर्धा चमचा चिरलेला बदाम
1 टेबलस्पून चिरलेले काजू
1 टेबलस्पून चिरलेला पिस्ता
एक चिमूटभर केशर

नारळाची खीर कशी बनवायची?
नारळाची खीर बनवण्यासाठी आधी दूध घ्यावे लागते.
यानंतर एक चमचा गरम दुधात केशर भिजवा.
आता एक कढई घ्या आणि संपूर्ण दूध घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
यानंतर दूध निम्मे झाल्यावर त्यात किसलेले खोबरे घालावे.
यानंतर नीट ढवळून घ्यावे आणि शिजू द्यावे.
आता त्यात साखर घाला आणि नीट ढवळून घ्या.
नंतर त्यात सर्व चिरलेला ड्रायफ्रुट्स घाला.
यानंतर खीर चांगली शिजू द्यावी आणि घट्ट होऊ द्यावी.
खीर घट्ट होऊ लागली की गॅस बंद करा.
यानंतर गार्निशसाठी आणखी काही ड्रायफ्रूट्स घाला.
आता खीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
जर तुम्हाला थंड खीर आवडत नसेल तर ती फ्रीजमध्ये ठेवू नका.
यानंतर सर्व्ह करा आणि खीरचा आस्वाद घ्या.