पुणे-नगर रोडवरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Traffic : खराडी-चंदननगर येथील महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या सभेच्या निमित्ताने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुक कोंडी टाळण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे-अहमदनगर रोडवरील जड-अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर बाजूकडून पुणे शहराकडे येणारी जड-अवजड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे जातील. सदर आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने, उदा. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस यांना लागू राहणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

You May Also Like