पंतप्रधान मोदींना चोर म्हणणाऱ्या अमोल मिटकरींच्या अडचणीत वाढ, पोलिसात तक्रार दाखल

सोलापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काल सोलापूर येथे एका सभेस संबोधित करत असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “मोदी हे चोर आहेत, त्यांनी अमीन सायनी यांचे शब्द चोरलेले आहेत” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पंतप्रधान मोदींबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य करणे आता त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. असे वक्तव्य केल्याबद्दल अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. भाजप सोलापूर शहराच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिटकरींच्या या व्यक्त्व्यावरून आमच्या भावना दुखावल्या आहेत, म्हणून सदरची तक्रार दिली आहे. तरी अमोल मिटकरी यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम १५३ अ, ५००, ५०५ (२) या प्रमाणे गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप सोलापूर शहरकडून केली गेली आहे.

यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, उपाध्यक्ष विजया वड्डेपल्ली, शहर चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश साखरे, प्रेम भोगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव संगेपान, मध्य पूर्व मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, उपाध्यक्ष मनोज कलशेट्टी, सरचिटणीस गिरीश बत्तूल, सोशल मीडिया प्रमुख योगेश गिरामआधी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते