गुगल क्रोमच्या लोगोत ८ वर्षानंतर बदल! वाचा ‘हा’ बदल नेमक्या कोणत्या वापरकर्त्यांना दिसणार

मुंबई : गुगल क्रोमने 8 वर्षांनंतर आपला लोगो बदलला आहे. मात्र अद्यापही सर्व गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी नवीन लोगो जारी केला नाही.
2014 सालानंतर कंपनीने गुगल क्रोमचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल क्रोमचे डिझायनर एल्विन हू यांनी ट्विटरवर गुगल क्रोमचा पहिला लुक शेअर केला आहे.

गुगल क्रोमचे डिझायनर एल्विन हू म्हणाले की, तुमच्या पैकी काहींनी गुगल क्रोमच्या नवीन लोगोबद्दलच्या गोष्टीचं निरिक्षण केलं असेल. आम्ही ८ वर्षानंतर प्रथमच कंपनीचं लोगो बदलत आहोत. आता तुम्हाला विचार पडला असेल, आम्ही हे का करतो आहोत?

सध्या आम्ही क्रोमवरील विंडोजवर नेटिव्ह विंडो ऑक्लुजन फीचर, मँक ओएसवर एम वन सपोर्ट, आय एसओ/अँड्रॉइड वर विजेट्स आणि अँड्रॉइडवर मटेरियल यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा अभ्यास करत आहोत. आमची कंपनी अधिक सुरक्षितेतची काळजी घेत आहे. तसेच लोगोमधील रंग अधिक उठावदार दिसण्यासाठी आम्ही लोगोत बदल करत आहोत, असंही ‘एल्विन हु’ म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काही वापरकर्त्यांना नवीन लोगोमधील बदल दिसत असणार. तर पुढील काही महिन्यांत सर्व वापरकर्त्यांना लोगोमधील बदल दिसणार आहे. 2008 पासून क्रोम लोगोमध्ये अनेक बदल झाले आहेत. मात्र, 2014 सालानंतर आता नवा बदल होत आहे.