भाजपच्या ‘या’ महिला आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

पटना – नरकटियागंजमधील भारतीय जनता पक्षाच्या आमदार रश्मी वर्मा यांनी रविवारी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देण्याची घोषणा केली.बिहार विधानसभेच्याअध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात वर्मा म्हणाल्या की,मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे बिहार विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे . कृपया माझा राजीनामा स्वीकारा.

रश्मी वर्मा यांच्या राजीनाम्यामुळे मोठी उलथापालथ होऊ शकते. तसेच सत्ताधारी पक्षाचे राजकीय गणित सुद्धा आगामी काळात बिघडू शकते. सभापतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्यास विधानसभेतील भाजपची संख्या 73 वर जाईल.

2020 मध्ये 243 जागांच्या मजबूत बिहार विधानसभेत NDA ने 125 जागांचे बहुमत मिळवले होते त्यापैकी भाजपने 74 जागांवर विजय मिळवला होता, JD(U) 43 जागा जिंकल्या होत्या तर आठ जागा NDA इतर दोन घटकांनी जिंकल्या होत्या. दुसरीकडे, आरजेडी 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर काँग्रेसने 70 जागांपैकी केवळ 19 जागा जिंकल्या.