न्यूज क्लिकच्या 25 पत्रकारांची दुसऱ्यांदा चौकशी, संपादक आणि एचआर न्यायालयात हजर होणार

News Click – देशविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप असलेल्या ‘न्यूजक्लिक‘ या ऑनलाइन न्यूज पोर्टलवर नोंदवलेल्या बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्या (UAPA) प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने पोर्टलच्या सुमारे 25 पत्रकारांना आणि त्यांच्या योगदानकर्त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात दुसऱ्यांदा या लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून अद्याप कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. स्पेशल सेलने 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वेबसाइटशी जोडलेल्या अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि नऊ महिला पत्रकारांसह सुमारे 46 लोकांची चौकशी केली होती.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अटक केल्यानंतर सर्वांना दुसऱ्या फेरीत चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यापैकी सुमारे 25 आतापर्यंत हजर झाले आहेत. न्यूज क्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांची सात दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी संपणार आहे. दोन्ही आरोपींना मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे आणि आयओ (तपास अधिकारी) त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती करू शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया