पंतप्रधानांच्या वाढदिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या; शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर तरी मोदीसरकार जागं होणार का? 

मुंबई  –  आंधळे… बहिरे.. मुके झालेल्या मोदीसरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या व्यथा दिसत नाही म्हणूनच शेतकरी त्यांच्या वाढदिवशी आत्महत्या करत असून आता तरी मोदी सरकार जागं होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवशी महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे आणि तसा उल्लेख त्या शेतकऱ्याने केला आहे. देशातील लोकांना अन्न पुरवणारा आपला अन्नदाताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आत्महत्या करतो ही शोकांतिका आहे असेही महेश तपासे म्हणाले.