ऊर्जा क्षेत्रात महिलांचे दमदार पाऊल,ओएनजीसीची धुरा अलका मित्तल यांच्याकडे

देशातील सर्वात प्रभावी असलेली महत्वपूर्ण कंपनी म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कंपनी म्हणजे ओएनजीसीची धुरा पहिल्यांदा महिलांच्या हाती आली आहे.आता ऊर्जा क्षेत्रात देखील महिलांनी दमदार कामगिरी केली आहे. ओएनजीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली.

अलका मित्तल या ओएनजीसीच्या चेअरमन असतील. त्यांच्यावर व्यवस्थापकीय पदाची अतिरिक्त जबाबदारी असेल.भारत सरकारच्या मालकीच्या असलेल्या कंपनीच्या मोठ्या पदावर पाहिल्यांदाच महिलेची नियुक्ती केल्यामुळे या गोष्टीकडे मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

डॉ. अलका मित्तल या उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे अर्थशास्त्रातील पदवीत्यूर पदवी, एमबीए, वाणिज्य शाखेतील पदवीआणि बीझनेस स्टडीमधील डॉक्टरेट आहे. त्या 1985 साली शिकाऊ पदवीधर म्हणून कंपनी जॉइन झाल्या होत्या. .त्या नंतर 2018 मध्ये त्या कंपनीच्या मानव संसाधन प्रमुख पदी दाखल झाल्या. आता त्या संचालक बनल्या आहेत.