हे इतिहासातील सर्वात कमी वेळेचं अर्थसंकल्पीय भाषण होतं, यातून फार काही मिळालेलं नाही- शशी थरूर

Interim Budget 2024: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अवघ्या ५८ मिनिटांत अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण पूर्ण केलं असून ५.८ टक्के तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे आजपर्यंत दिलेलं सर्वात कमी वेळेचं अर्थसंकल्पीय भाषण होतं (५७ मिनिटे). यातून फार काही मिळालेलं नाही. नेहमीप्रमाणे खूप सारी विशेषणं, अलंकारिक भाषा आणि अंमलबजावणीच्या पातळीवर अत्यंत कमी उल्लेख. निर्मला सीतारमण यांनी विदेशी गुंतवणुकीचा उल्लेख केला, पण त्यात कमालीची घट झाल्याचं मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. आकडेवारीबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी खूपच कमी आकडे सादर केले, अशा शब्दांत शशी थरूर यांनी अर्थसंकल्पातील त्रुटी सांगितल्या.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी